साहित्य संमेलनांना आर्थिक सहाय्य : ना डावं, ना उजवं!
पूर्वी राजे आणि धनिक सांस्कृतिक क्षेत्राला आश्रय देत असतं. असे उपक्रम आखण्याइतका निधी जनता उभारून देऊ शकत नाही (किंवा खरं तर, देत नाही) म्हणून, ती जबाबदारी आता सरकारवर आलेली आहे. सरकार सेना-भाजपचे आहे म्हणून सांस्कृतिक उपक्रमांना झालेलं आर्थिक सहाय्य काही भगवं, प्रतिगामी किंवा उजवं ठरत नाही आणि सत्ता काँग्रेसची असली म्हणून सांस्कृतिक क्षेत्राला सहाय्यभूत ठरणारं ते धन काही कथित सेक्युलर-पुरोगामी-डावं ठरत नाही.......